Posts

इरळी येथील महादेव मंदिरामध्ये तरुणाने शोधला प्राचीन खेळपट

Image
इरळी येथील महादेव मंदिरामध्ये तरुणाने शोधला प्राचीन खेळपट सांगली जिल्हातील कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी या गावी जवळपास एक हजार ते बाराशे वर्ष जुने चालुक्यकालीन मंदीर आहे. या मंदिरामध्ये तीन गर्भगृह आहेत व मंदिराच्या बाहेरील बाजूस वैशिष्ट्यपूर्ण अश्या सुरसुंदरी यांच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत  बेडग गावचे इतिहास अभ्यासक श्री.पृथ्वीराज माने हे या मंदिराला भेट देण्यासाठी गेले असता त्याना मंदिरा च्या प्रवेशद्वारा शेजारील दोन्ही बाजूस एक विशिष्ट प्रकारचे खेळपट आढळून आले. या खेळपटा ची अधिक माहिती घेतली असता असे लक्षात आले कि रोमन साम्राज्य व रोमन व्यापार्यांचा नाईन मेन्स मॉरिश (नवकंकरी )व पंचखेलिया या बैठया खेळाचे ते अवशेष आहेत. पृथ्वीराज माने यांना या प्राचीन खेळपटा विषयी मार्गदर्शन व माहिती नाशिक येथील प्राचीन खेळपट संवर्धन मोहिमेचे अध्यक्ष श्री सोज्वळ साळी यांच्याकडून मिळाली. सापडलेल्या खेळपटाची प्राचीन खेळपट संवर्धन मोहिमे अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. या सापडलेल्या खेळपटा च्या खेळाविषयी अधिक माहिती अशी कि प्राचीन व्यापारी मार्गावर परदेशी व्यापारी, प्रवासी, पर्यटक यांचा प्...

पेड येथील गढीवजा वाडा

Image
पेड येथील गढीवजा वाडा बहामनी, आदिलशाही व निजामशाही राज्यामध्ये अनेक पराक्रमी घराणी उदयास आली ज्यांनी स्वपराक्रमाने इतिहासाच्या पानावर एक वेगळाच ठसा उमटवला  सांगली जिल्ह्य़ातील तासगाव तालुक्यातील "पेड" या गावातील धनगर जातीचे "शेंडगे घराणे" आदिलशाही या इस्लामी राज्याची सेवा करत होते यासाठी आदिलशाहाने बरीच गावे शेंडगे घराण्याला इनाम म्हणून दिली होती पेड गावात एका उंच ठिकाणी शेंडगे घराण्याचा मोडकळीस आलेला गढीवजा वाडा आजही तग धरून उभा आहे वाड्याचा बराचसा भाग नष्ट झाला असून तिन बुरूज व एक भला मोठा दरवाजा एवढच काही शिल्लक राहिल आहे 

एरंडोली गावातील विरगळ

Image
एरंडोली गावातील विरगळ  नमस्कार मित्रांनो आज एरंडोली ता मिरज जि सांगली या गावी जाण्याचा योग आला. तर येथील वडाच्या झाडाखाली एक अर्धवट तुटलेल्या अवस्थेत असणारी विरगळ पाहण्यात आली. विशेष म्हणजे यावरती लढाईमधील अनेक वीर दाखविण्यात आले आहेत म्हणजे या भागात एखाद्या लढाईत अनेक वीर धारातीर्थी पडलेले असावेत. स्थानिक लोकांना त्याबद्दल काहीच माहिती नव्हती. तिथे आसपास अजून बरीच समाधी स्थळे आहेत. काही ग्रामस्थांनी सांगितले कि पूर्वी या ठिकाणी स्मशान होते. ठिकाण -एरंडोली चौकातील वडाचे झाड  चला तर आता आपण पाहूया विरगळ म्हणजे काय        जसे आज एखादा सैनिक शहीद झाला ह्याचा अर्थ त्याने आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली म्हणून आपण त्याच एक स्मारक उभारतो तसेच प्राचीन काळापासून हीच कला अवगत झाली . ज्या ज्या व्यक्तींनी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी म्हणजे आपल्या धर्मासाठी , आपल्या राज्यासाठी, गावासाठी , आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी किंवा आपल्या संपत्तीच्या, जनावरांच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता प्राणाची आहुती देणाऱ्या व्यक्ती ...

कोल्हापूर येथील न्यू पॅलेस व भवानी मंडप

Image
कोल्हापूर येथील न्यू पॅलेस ( नविन राजवाडा ) व जुना राजवाडा (भवानी मंडप )  कोल्हापूर म्हणजे श्री महालक्ष्मी मंदिर आणि छत्रपतींची गादी. याच कोल्हापूर मधे सुप्रसिद्ध असलेले श्री शाहू महाराज संग्रहालय खूप सुंदर आहे. मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करण्यापूर्वी संग्रहालयाचा आजूबाजूचा हिरवाईने नटलेला परिसर, एक विस्तीर्ण उद्यान तसेच राजवाड्याच्या परिसरातील खुले प्राणी हरीण, सांबर, इमू पक्षी ,बदक पर्यटकांसाठी आकर्षण ठरतात.  छत्रपती शाहू पॅलेस 1877 ते 1884 या काळात बांधण्यात आले. ब्रिटीश वास्तुविशारद ‘चार्ल्स मॅत’ यांनी या राजवाड्याचे डिझाईन केले आहे. काळ्या रंगाच्या पॉलिश केलेल्या दगडात बांधलेला हा राजवाडा वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना असल्याने, पर्यटकांच्या आर्कषणाचा भाग झाला आहे. या वस्तुसंग्रहालयाचे वैशिष्ट्य ठीक ठीकाणी शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित घटनांची चित्र रेखाटलेली आहेत. संग्रहालयात फोटो काढण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे फोन बंद केल्यानंतरच आत प्रवेश दिला जातो. पॅलेसच्या तळमजल्यावर वस्तुसंग्रहालय आहे. राजेशाही कुटुंबातील वेशभूषा, दागिने, मौल्यवान वस्तू यांचा एक सुरेख सं...

जाधवगढी ( गढी )सासवड

Image
जाधवगढी ( गढी ) हॉटेल {सासवड} ह्याला 'गड' असे म्हटले, तरी 'रायगड', 'सिंहगड' यासारखे हे भव्यदिव्य प्रस्थ नाही. भुईकोट किल्ला किंवा एखादी गढीच म्हणा ना ! हा गड आणि आजूबाजूचा १५ एकराचा परिसर ही जाधव घराण्याची व्यक्तिगत मालमत्ता आहे.     सुमारे तीनशे वर्षापूर्वी जेव्हा संभाजी महाराजांचे सुपुत्र शाहू महाराज गादीवर आले तेव्हा मराठा साम्राज्याचे कोल्हापूर आणि सातारा संस्थान असे दोन छत्र झाली. सातारामध्ये शाहू महाराजांच्या छत्राखाली जे सरदार गोळा झाले त्यात पिलाजीराव जाधवराव यांचा समावेश होता.  त्यांच्या अंगी असल्याले शौर्य आणि तलवारीचे पाणी ह्याच्या जोरावर त्यांनी शाहूराजांच्या सेवेत बरीच मर्दुमकी गाजवून ते राजांच्या अत्यंत जवळच्या वर्तुळात पोहोचले. २१ वर्षे औरंगजेबाच्या कैदेत काढून आलेल्या शाहूराजांना गादीवर बसविण्यात पिलाजीरावांचा सिंहाचा वाटा होता. त्याचे बक्षीस म्हणून त्यांना सासवड, मल्हारगाव,आणि आसपासची काही गावे जहागीर म्हणून मिळाली. सासवड हे शाहू महाराजांचे प्रमुख ठाणे होते. सुभेदार पिलाजीराव जाधवराव यांचं जाधववाडी गाव होतं. सासवड या जहागिरीवर लक्ष...

पणदरे गावच्या जगताप पाटलांचा वाडा

Image
पणदरे गावच्या जगताप पाटलांचा वाडा पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील पणदरे गावं हे छ. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्याकडे असणारी जहांगीर भीमथडी इंदापूरच्या प्रसिद्ध सुपा परगाणा याच सुपा परगाण्यातील एक इतिहासकालीन पणदरे गाव आणि मोठे गाव राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न असणारे गाव या गावांमध्ये जगताप पाटील आणि कोकरे पाटील दोन घराणे.                                जगताप पणदरेकर हे शिवपूर्वकालीन सरदार आणि पाटील घराणे       पणदराचे कोकरे व जगताप यांचे छत्रपती शाहू महाराज व पेशवाईत निमपाटीलकी राहिली त्यातील म्हणजे जगताप घराण्याचे ७ बेटे आहेत बेटे म्हणजे घराणी-वाड्याचा समूह त्यातील एक बेट म्हणजे आत्ताच्या घडीला जगताप वस्ती या नावाने ओळखले जाते या बेटांमध्ये पाटलांचे वाडे म्हणून ओळखले जाते. या बेटातील असणारी जगताप कुटुंबाकडे वंशवेलेप्रमाणे जगतापांचा मुळ शिवकालीन वाडा बारामती कडून येताना गावच्याकमानीतून प्रवेश करताच १००मी.अंतरावर पहिल्या चौकात शिवकालीन वाडा लागतो य...

मोहिते वाडा,राजेवाडी (ता. खंडाळा)

Image
 मोहिते वाडा,राजेवाडी (ता. खंडाळा)           गतकाळाचे वैभव सांभाळणारा पूर्वाभिमुखी असलेला वाडा भोर जवळील राजेवाडी इथे आहे. दर्शनी भागात भव्य सागवाणी दरवाजा, दरवाजाच्या बाहेरील बाजूस आठ खांबी लाकडातील लहान सोपा, त्याला कमरे इतक्या उंचीचा लाकडी सज्जा, सोप्याच्या मध्यातून दरवाजाकडे जाणाऱ्या पायऱ्या. सोप्याला लाकडी फळ्यांचा छत, त्या छतावर दुसऱ्या मजल्याचा नक्षीदार सज्जा. प्रवेशद्वाराबाहेरील नक्षीदार सागवानी खांब घडीव दगडीवर स्थापित केलेले आहेत. तळ मजला घडीव दगडी बांधकामात असून दर्शनी भागातील दुसरा व तिसरा मजला वीट बांधकामात आहे. मात्र वाड्याचा अंतर्गत भाग दुमजली आहे. चौसोपी वाड्याचे छताला थापिव कौलांचे आच्छादन आहे. भव्य दरवाजा ओलांडून आत प्रवेश करताच पहिल्या चौकाच्या मध्यभागी तुळशी वृंदावन, चारही बाजूला असलेल्या पडव्यांनी हा चौक होत असला तरी चोहोबाजूचे दगडी बांधकामातील जोते अष्टकोणी असून संपूर्ण फरसबंदी चौकात पडणारे पाऊसाचे पाणी बाहेर पडण्यासाठी अष्टाकृती आकाराचे घडीव दगडातील पाणी वाहिका देखणी आहे. डाव्या बाजूला देवघर आहे. देवघरात कुलस्वामिनी व इतर देवदेवता आहे...