एरंडोली गावातील विरगळ
एरंडोली गावातील विरगळ
नमस्कार मित्रांनो
आज एरंडोली ता मिरज जि सांगली या गावी जाण्याचा योग आला. तर येथील वडाच्या झाडाखाली एक अर्धवट तुटलेल्या अवस्थेत असणारी विरगळ पाहण्यात आली. विशेष म्हणजे यावरती लढाईमधील अनेक वीर दाखविण्यात आले आहेत म्हणजे या भागात एखाद्या लढाईत अनेक वीर धारातीर्थी पडलेले असावेत. स्थानिक लोकांना त्याबद्दल काहीच माहिती नव्हती. तिथे आसपास अजून बरीच समाधी स्थळे आहेत. काही ग्रामस्थांनी सांगितले कि पूर्वी या ठिकाणी स्मशान होते.
ठिकाण -एरंडोली चौकातील वडाचे झाड
जसे आज एखादा सैनिक शहीद झाला ह्याचा अर्थ त्याने आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली म्हणून आपण त्याच एक स्मारक उभारतो तसेच प्राचीन काळापासून हीच कला अवगत झाली . ज्या ज्या व्यक्तींनी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी म्हणजे आपल्या धर्मासाठी , आपल्या राज्यासाठी, गावासाठी , आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी किंवा आपल्या संपत्तीच्या, जनावरांच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता प्राणाची आहुती देणाऱ्या व्यक्ती म्हणजे विर ........
त्या वीरांनी गाजवलेल्या पराक्रम येणाऱ्या पुढील पिढीला कळवा त्यातून प्रेरणा घेऊन या वीरा सारखे असंख्य वीर उद्यायास यावे यासाठी अशा प्रकाच्या दगडी शिळा उभारल्या जाऊ लागल्या. आणि त्यांना नाव दिलं #विरगळ म्हणजेच वीरांचा दगड त्या काळी लिहने वाचणे अवगत नसल्या कारणाने त्या वीरांची ओळख सांगणे हे शक्य न्हवते पण त्या विराणे कोणत्या कारणासाठी बलिदान दिले हे सांगणे मात्र सोपे होते ते म्हणजे त्या शिळांवर कोरीवकाम करून . ह्या द्वारे त्यावेळी विरगळ ही संकल्पना जास्तीत जास्त प्रसारित झाली व गावो गावी , युद्ध रणांगण तसेच मंदिरे अशा ठिकाणी विरगळ दिसू लागले . त्या काळी अशी समजूत होती की ज्या गावात जास्त विरगळ ते गाव जास्त पराक्रमी आणि श्रेष्ठ आहे .
हे पराक्रमी योद्धे कोण असतील याचा विचार आज वर कोनीही केलाच नाही कारण बदलत्या काळानुसार अंधश्रद्धा ,राहणी मान इतके बदलत गेलं की त्या वीरांना कोनी देव बनून हळदी कुंकु लावत तर कुणी दगड म्हणून भिंती उभ्या केल्या तर अनेकांनी भीतीच्या पोटी त्यांना वाऱ्यावर सोडलं. पाणी , ऊन ,वाऱ्याच्या माऱ्यात त्यांची झीज झाली आणि कित्तेक विरगळ फक्त आणि फक्त एक दगड म्हणू जागच्या जागीच राहिले. आणि ह्याच दगडात आम्हा कित्येकांच्या पूर्वजांच्या समाध्या आहेत. ज्यांच्या मुळे आज आपण हे जीवन जगत आहोत त्यांनी वाहिलेल्या त्या रक्ताच्या थेंबाची आठवण करून देणारा आम्हाला कोनी मिळाला नाही .म्हणून आम्ही आजवर ह्या गोष्टी पासून दुरवलो गेलो. आणि सगळा इतिहास अम्हासाठी भूतकाळ बनून अदृश्य झाला.
ह्या अदृश्य झालेल्या इतिहासाला आपणच उजाळा दिला पाहिजे व त्याचे जतन केले पाहिजे
जर कोणाला एरंडोली गावचा अजून काही इतिहास माहिती असेल तर कंमेंट मध्ये नक्की सांगा
धन्यवाद
पृथ्वीराज माने सरकार
इतिहासप्रेमी
9146889612
Comments
Post a Comment