पेड येथील गढीवजा वाडा
पेड येथील गढीवजा वाडा
बहामनी, आदिलशाही व निजामशाही राज्यामध्ये अनेक पराक्रमी घराणी उदयास आली ज्यांनी स्वपराक्रमाने इतिहासाच्या पानावर एक वेगळाच ठसा उमटवला
सांगली जिल्ह्य़ातील तासगाव तालुक्यातील "पेड" या गावातील धनगर जातीचे "शेंडगे घराणे" आदिलशाही या इस्लामी राज्याची सेवा करत होते यासाठी आदिलशाहाने बरीच गावे शेंडगे घराण्याला इनाम म्हणून दिली होती पेड गावात एका उंच ठिकाणी शेंडगे घराण्याचा मोडकळीस आलेला गढीवजा वाडा आजही तग धरून उभा आहे वाड्याचा बराचसा भाग नष्ट झाला असून तिन बुरूज व एक भला मोठा दरवाजा एवढच काही शिल्लक राहिल आहे
Comments
Post a Comment