लोणी भापकर गावातील सरदार भापकर वाडा, पुणे

लोणी भापकर गावातील सरदार भापकर वाडा, पुणे 

 पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील लोणी भापकर या गावी सरदार भापकर यांची  ऐतिहासिक गडी आजही काही प्रमाणात सुस्थितीत आहे. गावात प्रवेश केल्यावर तटबंदी असलेली ही गढी दिसते. गढीचे रेखीव प्रवेशद्वार आत गेल्यावर एक लहानसा चौक लागतो. समोरच दिवाणखाना आहे तिथे असलेले रेखीव कोनाडे विशिष्टपूर्ण होते. आत मध्ये चौकातून समोर घरे आहेत. गढीतील वाड्याबाहेर एक छोटासा तलाव आहे. गावातील भैरवनाथ मंदिराबाहेर भरपूर वीरगळी आहेत. एकदम शिस्तबद्ध पद्धतीने मांडणी केलेली आहे. लोणी भापकरचे शिल्पवैभव असलेले मल्लिकार्जुन मंदिर लोणी भापकरच्या सौंदर्यात भर घालतात. भापकरांच्या पूर्वजांनी पेशवेकाळात अतिशय पराक्रम गाजविल्याचे इतिहास सांगतो. सरदार सोनजी वरकोजी भापकर हे पानिपतावर गेलेल्या अनेक सरदारांपैकी एक होते. 
भापकरांच्या पूर्वजांनी पेशवेकाळात अतिशय पराक्रम गाजविल्याचे इतिहास सांगतो. 
२४ सप्टेंबर १७५७ रोजी सकाळी पाऊस असता मराठ्यांचा सरदार हरबा बापू यांनी त्यांच्याशी सामना केला. मागाहून विसाजी कृष्ण त्यांच्या साह्यास धावून आले. इंद्रोजी कदम, सोनाजी भापकर अशा अवघ्यांनी तोंड लाविले. दोन कोसांच्या भुईवर सवाप्रहर पावेतो रण जाहाले. खासा अब्दुल मजीदखान गोळी लागून ठार झाला. सध्याचे वंशज श्री. उदयसिंहराव यांचे वडील श्री. आप्पासाहेब उर्फ धनी भापकर ते नेमबाजीत प्रवीण होते. 1944 साली त्यांनी गावावर आलेला दरोडा परतावून लावला त्यामुळे त्यांना ब्रिटिश सरकारकडून चांदीची तलवार सत्कारपूर्वक बक्षीस मिळाली होती.
पृथ्वीराज माने सरकार 

Comments

Popular posts from this blog

सरंजामदार गायकवाड सरकार वाडा व मंदिर, बेळंकी

शिंदे (देशमुख) यांचा बोरगाव येथील वाडा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.