शिंदे (देशमुख) यांचा बोरगाव येथील वाडा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.

🛑 शिंदे (देशमुख) यांचा बोरगाव येथील वाडा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.
 हा वाडा दीडशे वर्षांहून ही जुना असून वाड्यामध्ये आजही आपल्याला प्रमुख दरवाजाची दगडी कमान, घोडा बांधण्याची जागा (पागा), प्रवेश केल्यानंतर लहान सोपा व नंतर मोठा सोपा,6 ते 7 फुट जाडीच्या दगड व पांढऱ्या माती च्या भिंती, न्हाणी, स्वयंपाक घर, सागवानी जीना व त्याखाली धान्य साठविण्यासाठी बंदिस्त अंबारी दिसून येते. काळानुसार कुटुंबे वाढत गेली तसतसे वाड्यामध्ये काही बदल करण्यात आले. वाडा जीर्ण होत निघाला आहे आता बराचसा भाग पडलेला आहे. पण अजूनही त्याचे अवशेष आपणास पहावयास मिळतात.

Comments

Popular posts from this blog

सरंजामदार गायकवाड सरकार वाडा व मंदिर, बेळंकी