इरळी येथील महादेव मंदिरामध्ये तरुणाने शोधला प्राचीन खेळपट
इरळी येथील महादेव मंदिरामध्ये तरुणाने शोधला प्राचीन खेळपट सांगली जिल्हातील कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी या गावी जवळपास एक हजार ते बाराशे वर्ष जुने चालुक्यकालीन मंदीर आहे. या मंदिरामध्ये तीन गर्भगृह आहेत व मंदिराच्या बाहेरील बाजूस वैशिष्ट्यपूर्ण अश्या सुरसुंदरी यांच्या मुर्त्या कोरलेल्या आहेत बेडग गावचे इतिहास अभ्यासक श्री.पृथ्वीराज माने हे या मंदिराला भेट देण्यासाठी गेले असता त्याना मंदिरा च्या प्रवेशद्वारा शेजारील दोन्ही बाजूस एक विशिष्ट प्रकारचे खेळपट आढळून आले. या खेळपटा ची अधिक माहिती घेतली असता असे लक्षात आले कि रोमन साम्राज्य व रोमन व्यापार्यांचा नाईन मेन्स मॉरिश (नवकंकरी )व पंचखेलिया या बैठया खेळाचे ते अवशेष आहेत. पृथ्वीराज माने यांना या प्राचीन खेळपटा विषयी मार्गदर्शन व माहिती नाशिक येथील प्राचीन खेळपट संवर्धन मोहिमेचे अध्यक्ष श्री सोज्वळ साळी यांच्याकडून मिळाली. सापडलेल्या खेळपटाची प्राचीन खेळपट संवर्धन मोहिमे अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. या सापडलेल्या खेळपटा च्या खेळाविषयी अधिक माहिती अशी कि प्राचीन व्यापारी मार्गावर परदेशी व्यापारी, प्रवासी, पर्यटक यांचा प्...