कोल्हापूर येथील न्यू पॅलेस व भवानी मंडप
कोल्हापूर येथील न्यू पॅलेस ( नविन राजवाडा ) व जुना राजवाडा (भवानी मंडप ) कोल्हापूर म्हणजे श्री महालक्ष्मी मंदिर आणि छत्रपतींची गादी. याच कोल्हापूर मधे सुप्रसिद्ध असलेले श्री शाहू महाराज संग्रहालय खूप सुंदर आहे. मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करण्यापूर्वी संग्रहालयाचा आजूबाजूचा हिरवाईने नटलेला परिसर, एक विस्तीर्ण उद्यान तसेच राजवाड्याच्या परिसरातील खुले प्राणी हरीण, सांबर, इमू पक्षी ,बदक पर्यटकांसाठी आकर्षण ठरतात. छत्रपती शाहू पॅलेस 1877 ते 1884 या काळात बांधण्यात आले. ब्रिटीश वास्तुविशारद ‘चार्ल्स मॅत’ यांनी या राजवाड्याचे डिझाईन केले आहे. काळ्या रंगाच्या पॉलिश केलेल्या दगडात बांधलेला हा राजवाडा वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना असल्याने, पर्यटकांच्या आर्कषणाचा भाग झाला आहे. या वस्तुसंग्रहालयाचे वैशिष्ट्य ठीक ठीकाणी शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित घटनांची चित्र रेखाटलेली आहेत. संग्रहालयात फोटो काढण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे फोन बंद केल्यानंतरच आत प्रवेश दिला जातो. पॅलेसच्या तळमजल्यावर वस्तुसंग्रहालय आहे. राजेशाही कुटुंबातील वेशभूषा, दागिने, मौल्यवान वस्तू यांचा एक सुरेख सं...