बेनजर बंगला (व्हीला) - राधानगरी

बेनजर बंगला (व्हीला) - राधानगरी 
1908 साली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरी येथे श्री लक्ष्मी तलावाचे काम सुरू केले. या श्री महाराणी लक्ष्मी तलावाचे बांधकामावर देखरेख करण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी श्री महाराणी लक्ष्मी तलावाचे हद्दीत बेनजर नावाच्या नवीन बंगला इ. स. 1912 साली बांधला. या बेनजर बंगल्यासाठी महाराजांनी मौजे पुंगाव पेटा करवीर येथील जंगलातील साठ सागवानी सर दिलेले होते त्या सागवानी सरांचे हाशिल न घेता त्याचा दाखला मोफत रजिस्टरास घेण्याबद्दल राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आदेश दिलेला होता
या आदेशामध्ये खुद्द राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी श्री महाराणी लक्ष्मी तलावाचे हद्दीतील बंगल्याचे नाव - बेनजर असे नमूद केलेले आहे.
राजर्षी शाहू छत्रपती महाराज म्हणजे कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचा पायाच होय. राजर्षिनी कोल्हापूरच्या विकासासाठी शेती सुधारणा,औद्योगिक विकास, कला क्षेत्रास राजाश्रय, वनसंवर्धन, क्रीडा क्षेत्रास प्रोत्साहन,त्याचबरोबर दुष्काळी वातावरणावर मात करण्यासाठी जलपुरवठा योजना यासाठी भोगावती नदीवर राधानगरी धरणाची योजना तयार करून प्रसंगी कर्ज काढून हि योजना पूर्णत्वास नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला,राजर्षिच्या पश्चात छत्रपती राजाराम महाराज आणि कोल्हापूरच्या जनतेने हि योजना पूर्णत्वास नेली. याच राधानगरीच्या जलसाठ्याच्या मधोमध एक टेकडी आहे चौबाजूनी पाण्याने वेढलेली या टेकडीवर राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेला एक महत्वाच ठिकाण म्हणजे 'बेनजर व्हीला' होय.हि वास्तू एखादे रेस्ट हाऊस म्हणून तयार केली की आणखी काही कारणाने हे लक्षात येण्यास मार्ग नाही संदर्भ अजून सापडलेला नाही,पण हि अप्रतिम वास्तू पाहण्यास पर्यटकांची तुफान गर्दी होत आहे या ठिकाणावर आत्ता पाणी अटल्यामुळे चालतही जाता येत.
 ऐतिहासिक वाडे व गढी
पै.पृथ्वीराज माने सरकार


Comments

Popular posts from this blog

सरंजामदार गायकवाड सरकार वाडा व मंदिर, बेळंकी

शिंदे (देशमुख) यांचा बोरगाव येथील वाडा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.