डफळे सरकार (जत सरकार ) यांचा जत येथील वाडा

डफळे सरकार (जत सरकार )यांचा जत येथील वाडा 
डफळे सरकार (जत सरकार)सांगली जिल्ह्यातील जत हे डफळे संस्थानाची मुख्य ठिकाण किंवा राजधानी होते. घराण्यातील मूळ पुरुष म्हणून सटवाजी यांच्या कडे पाहिले जाते. सटवाजी पराक्रमी होते . संताजी बरोबर त्याची दोड्डेरीची लढाई, साताऱ्याची लढाई प्रसिद्ध आहे. मोगल कागदपत्रात देखील सटवाजीचे उल्लेख सापडतात. सटवाजी हे कर्नाटकी बर्कँदाज बळगण्यासाठी प्रसिद्ध होता. बर्कँदाज म्हणजे बंदुका चालवणारे शिपाई. त्याकाळी बंदुका वापरणे म्हणजे आधुनिकतेचे प्रतीक होते. शिवाजी महाराजांच्या काळात हे कधीच स्वराज्यात नव्हते . मुघलांच्या बाजूने लढणाऱ्या काही प्रमुख दुय्यम दर्जाच्या सरदारात माने, घोरपडे , घाटगे डफळे घराण्याचा समावेश होतो.११ जानेवारी १७०३ रोजी त्यानी औरंजेब ला विनंती केली की माझ्या "फौजे बरोबर मुगलखानाची वागणूक बरी नाही तरी माझी नेमणूक फिरोजजंग याच्या फौजेत करावी" त्याची ही मागणी मंजूर पण झाली होती. त्यावेळी त्याला ६ हजार जात आणि ६ हजार स्वार अशी मनसब होती.संस्थान म्हणून प्रसिद्धी पावलेल्या डफळे घराण्याची कारकीर्द उत्तम राहिली . यांचा स्वतःचा ध्वज देखील होता. जत गावात भव्यदिव्य , सुंदर असा वाडा आहे. उमराणी गावात व डफळापुर येथे देखील वाडे आहेत .

Comments

Popular posts from this blog

सरंजामदार गायकवाड सरकार वाडा व मंदिर, बेळंकी

शिंदे (देशमुख) यांचा बोरगाव येथील वाडा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.