सरंजामदार गायकवाड सरकार वाडा व ऐतिहासिक मंदिर बेळंकी ता. मिरज जि सांगली बेळंकी हे एक ऐतिहासिक गाव आहे.या गावातील काशिलिंग मंदिर हे चालूक्यकालीन आहे.तत्कालीन एका ताम्रपटात या गावाचा उल्लेख बेलूवलीके असा केला आहे.याच गावालगत असणाऱ्या डोंगरावर पहिल्या ते तिसऱ्या शतकात कोरलेली बौध्द लेणी आहेत.बेळंकी हे गाव सतराव्या शतकात 1739 मध्ये पोसजी गायकवाड यांना सातारच्या छत्रपती शाहू नी सरंजामासाठी खर्चासाठी इनाम दिले होते. याच गायकवाड सरकारांनी कर्नाटकतील टिपू सुलतान व हैदर अली विरोधातील काही लढायामध्ये पटवर्धनांच्या बाजूने सहभाग घेतल्याचे उल्लेख आहेत.गावात गायकवाड सरकारांची भव्य गढी आहे.यांनी जानराववाडी आणि चाबूस्करवाडी ही दोन गावे वसवली.पोसजी गायकवाड हे बेळंकी मध्ये आलेले पहिले गायकवाड आहेत.रावजी - पोसजी -मानोजी - जानराव - रामचंद्रराव - जानराव - शहाजीराव अशी नावे कागद पत्रात आढळून येतात
🛑 शिंदे (देशमुख) यांचा बोरगाव येथील वाडा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. हा वाडा दीडशे वर्षांहून ही जुना असून वाड्यामध्ये आजही आपल्याला प्रमुख दरवाजाची दगडी कमान, घोडा बांधण्याची जागा (पागा), प्रवेश केल्यानंतर लहान सोपा व नंतर मोठा सोपा,6 ते 7 फुट जाडीच्या दगड व पांढऱ्या माती च्या भिंती, न्हाणी, स्वयंपाक घर, सागवानी जीना व त्याखाली धान्य साठविण्यासाठी बंदिस्त अंबारी दिसून येते. काळानुसार कुटुंबे वाढत गेली तसतसे वाड्यामध्ये काही बदल करण्यात आले. वाडा जीर्ण होत निघाला आहे आता बराचसा भाग पडलेला आहे. पण अजूनही त्याचे अवशेष आपणास पहावयास मिळतात.
Comments
Post a Comment